सोलापूर : सकल मराठा समाज जुळे सोलापूरच्यावतीने सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या राजीनामाची मागणी करीत त्यांच्या निवासस्थानसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार सुभाष देशमुख हेही सहभागी झाल्याचे दिसून आले.
आरक्षणासाठी सकल मराठा समाज एकवटला असून आंदोलनाची धार त्रिव्र होत चालली आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर जुळे सोलापुरातील कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सहा दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावली आहे. तरीसुद्धा सरकारला जाग आली नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. मंगळवारी आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबतच त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून मराठा समाजातील तरुणांनी रोष व्यक्त केला. यावेळी मराठा तरुणांनी सुभाष देशमुख यांना एकच प्रश्न विचारला की 50% मधून ओबीसीच्या कोट्यातून आरक्षणबाबत तुमची भूमिका काय? याचे उत्तर द्यावं. त्याचे उत्तर देताना सुभाष देशमुख यांनी अपेक्षित उत्तर दिले नाही. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या निषेध करून मराठा तरुण संतापाच्याभरात सुभाष देशमुख यांच्या विरोधात घोषणा देत निघून गेले. यावेळी सकल मराठा समाज जुळे सोलापुराचे सर्व मराठा समाज बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध