-
सोलापूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२. हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गावात झालेल्या उत्कृष्ट कामावर ‘स्वच्छता फोटो मोहीम’’ केंद्र शासनाने हाती घेतली आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छतेवर चित्रपट स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
सोलापूर जिल्हयात २७२ ग्रामपंचायती माॅडेल या श्रेणी मध्ये आहेत. या गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांचे फोटो अपलोड करणेबाबत पाणी पुरवठा स्वच्छचा विभागाने सुचना दिलेल्या आहेत. या गावात झालेल्या स्वच्छता विषयक उत्कृष्ठ फोटो केंद्र शासनाचे संकेतस्थळावर अपलोड करणेबाबत केंद्र व राज्य शासनाने सुचना दिलेले आहेत. या मोहिमेबाबत जनजगृती करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना देणेत आल्या आहेत. येत्या ३० नोव्हेबरपर्यंत या मोहिमेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
या कालावधीत झालेल्या उत्कृष्ट दर्जाची छायाचित्र निर्मिती करून MYGOV.in पोर्टल वर अपलोड करणेबाबत केंद्र शासनाने सूचना देणेत आले आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट स्पर्धा
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२. हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गावात झालेल्या उत्कृष्ट कामाच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट स्पर्धेचे आयोजन करणेत आले असल्याचे सिईओ आव्हाळे यांनी सांगितले. त्या अनुषंगाने हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गावातील उत्कृष्ट चित्रपट स्पर्धेबाबत तालुका व गाव स्तरावर चित्रपट निर्माते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.

More Stories
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार