March 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

काय म्हणता… 14 डिसेंबरपासून हे कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

सोलापूर : जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी अन्यथा १४ डिसेंबर पासून बेमुदत संप नोटीस व माझे कुटुंब माझी पेन्शनचा इशारा कर्मचारी संघटना यांनी दिला आहे.

झेडपी समोरील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर बुधवारी विविध संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. कंत्राटी कर्मचारी कायम करा, या घोषणानी परिसर दणाणून गेला.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शासकीय निमशासकीय समन्वय समिती यांच्यावतीने माझे कुटुंब, माझी पेन्शन या शीर्षकखाली  ८ मागण्यांच्या आग्रहासाठी उभारलेले “सहकुटुंब महामोर्चा” आंदोलन करण्यात आले.यानंतर सरकारी-निमसरकारी- जिल्हा परिषद शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी नगरपालिका नगरपरिषद कर्मचारी
समन्वय समितीतर्फे  जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना  देण्यात आले. या प्रसंगी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष शंतनु गायकवाड, अध्यक्ष विरूपाक्ष घेरडे, निमंत्रक अशोक इंदापूरे, अशोक जानराव, सरचिटणीस अमृत कोकाटे, किशोर साबळे, जिल्हा परिषद कर्मतारी संघटनेचे विवेक लिंगराज, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव, लिपिकवर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे,जिल्हाध्यक्ष दिनेश बनसोडे, संघटक राजेश देशपांडे, लक्ष्मण वंजारी,  अनिल बिराजदार, सचिन सोनकांबळे, निर्मल पवार, नर्सेस संघटनेचे  सचिन मायनाळे, महापालिका सफाई कर्मचारी सघटनेचे सायमन गटू, शेषेराव शिरसट . बापू सदाफुले ‘ बाली मंडेपू, गणेश अंजीरखाने, पाटबंधारे व सार्वजनिक बांधकामचे सचिव अमर भिंगे,  लक्ष्मण आयगोळे पंकज गुरव. तलाठी सघटनेचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर, सचिव  पाडूरंग हिपरकर, नरेश बोनाकृती,  राजू कय्यावाले, दिपक पुजारी, देवीदास शिंदे,  राहुल सुतकर, चद्रकांत चलवादी , उमेश कदम, सिव्हील हॉस्पीटलचे शंकर जाधव, नितीन कसबे, पंकज जाधव, प्रतिक शिवशरण, महेश बनसोडे, मंजूनाथ गायकवाड, पुंडलिक बनसोडे उपस्थित होते.