सोलापूर : खरेदी विक्री अर्थात जिल्हा मुद्रांक कार्यालयामर्फत मराठा कुणबी नोंदी तपासण्याचे काम सुरू झाले आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजातील प्रतिनिधींबरोबर नुकतीच बैठक घेतली. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महसूल कार्यालयामार्फत मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण व महसूल विभागाकडे नोंदणी तपासण्याचे काम सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर सरकार दप्तरी इतर कार्यालयात अशा नोंदी आढळतात का याचीही तपासणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, महापालिका कार्यातील जन्म- मृत्यू नोंदीची तपासणी करण्यात येत आहे. शेत, जमिनीची खरेदी विक्री करतानाही यापूर्वी नोंदी झाल्याचे निदर्शनाला आले आहे. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी- विक्री कार्यालयातील नोंदणी तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे मराठा कुणबी नोंदणी तपासण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी दिली. जिल्ह्यात दहा ठिकाणी व शहरात चार उपनिबंधकाची कार्यालये आहेत. पण या कार्यालयाचे सर्व रेकॉर्ड जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. दोन पथकांमार्फत हे रेकॉर्ड तपासण्यात येत आहे. 1948 ते 1967 या काळातील नोंदी तपासल्या जाणार आहेत, असे गीते यांनी सांगितले.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध