सोलापूर: झेडपी कर्मचाऱ्यांना आता वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छापत्र मिळणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

जिल्हा परिषदेच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गेल्या दहा वर्षात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नव्हते. आता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या नेमून दिलेल्या कामाच्या अनुषंगाने त्यांची परीक्षाही घेतली जाणार आहे.  कामाबाबत त्यांचे ज्ञान कितपत आहे हे तपासले जाणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना कामातील आनंद कायम ठेवण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सीईओ आव्हाळे यांच्या सहीचे शुभेच्छापत्र दिले जाणार आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना सीईओ आव्हाळे म्हणाल्या कर्मचाऱ्यावर कामाची जबाबदारी असतेच. अनेक कर्मचारी नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडताना दिसतात. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होण्यासाठी प्रशस्तीपत्र गरजेचे आहे. चांगल्या कर्मचाऱ्यांचा गौरव होणेही अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येकांच्या वाढदिवस हा त्यांच्या जीवनातील आनंदाचा दिवस असतो.  याचे औचित्य साधून आता प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छापत्र दिले जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासन विभागाने सर्व कर्मचाऱ्यांचा डाटा गोळा केलेला आहे. शुभेच्छापत्र पाठविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यातून कर्मचाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, ही अपेक्षा आहे.

तीन वर्षात काम मागे…

सीईओ आव्हाळे म्हणाल्या गेल्या तीन वर्षात बरीच कामे प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद विकासात एक नंबर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना गतिशील करणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाच्या कामाच्या अनुषंगाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण पार पडेल. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून कामाची गती वाढेल अशी अपेक्षा आहे. जलजीवन, घरकुल, स्वच्छता अभियान, बचत गटाच्या कामाला बरीच गती आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *