सोलापूर : प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी एका इसमांकडून दोन लाखाची मागणी करून एक लाखावर तडजोड केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फौजदार विक्रमसिंह रजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे एक तक्रार आली होती. प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फौजदार रजपुत यांनी दोन लाखाची मागणी केल्याची तक्रार होती. पोलिसांनी सापळा लावला. तक्रारदारास दोन लाखाची मागणी करून एक लाख देण्यावर तडजोड केल्याप्रकरणी फौजदार रजपुत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक गणेश कुंभार यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलीस निरीक्षक अडचणीत
पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून हा दुसरा ट्रॅप आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पोलीस आयुक्तालयात चर्चा आहे