सोलापूर : अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी डॉ.लक्ष्मण हेमू राठोड ( रा- विजापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी.शिरभाते यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

  1. यात हकीकत अशी की, पीडीतेचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. पिडीता व आरोपी पळून जाऊन बदलापूर येथे राहिले आणि त्यातूनच पिडीताही गर्भवती राहिली, तशी फिर्याद पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पिडीतेने तिच्या पालकांसोबत राहण्यास नकार दिल्यामुळे तिला बालकल्याण समितीच्या ताब्यात ठेवले होते. 19 जुलै 2023 रोजी पीडितेची आई व तिची बहीण यांनी पिडीतेची समजूत काढून तिस घरी घेऊन गेले.  बहिणीने तिला दवाखान्यात दाखविले असता ती सहा महिन्याची गरोदर असल्याचे कळाले व त्यावेळी पिडीतेस तिची बहीण व इतरांनी गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करण्यास सांगितले व तिचे इच्छे विरुद्ध जबरदस्तीने गर्भपात केला,अशा आशयाची फिर्याद दि:-21 जुलै रोजी वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात अटक होईल या भीतीपोटी  डॉ. राठोड यांनी एडवोकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता.अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात, पीडितेच्या पोटातील अभ्रक हे मृत अवस्थेत होते. त्यामुळे पिडीतेचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक उपचार करून मृत गर्भ बाहेर काढला व तशी नोंद केस पेपरला असल्याचा युक्तिवाद केला, त्यावरून न्यायाधीशांनी 50 हजाराच्या जातमुचलक्यावर अटीवरती अटकपूर्व जामीन मंजूर केला.यात अर्जदार डॉक्टरतर्फे ऍड.मिलिंद थोबडे,ऍड.अभिजीत इटकर, ऍड.दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे ऍड दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *