सोलापूर : दाखल गुन्ह्यात वाहन जप्त न करणे व तपास कामात मदत करण्यासाठी एक लाखाची लाच मागून 35 हजाराची लाच स्वीकारताना पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार सचिन शिंदे याला सोलापूरच्या अँटिकरप्शन पथकाने रंगेहात पकडले.
पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात सोलापूरच्या एका वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात वाहन जप्त न करणे व तपास कामात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे (राहणार: सुसगा, मुळशी) यांनी एक लाखाची लाच मागितली. संबंधित वाहन मालकाने सोलापुरातील अँटीकरप्शनशी संपर्क साधून तक्रार केली. अँटी करप्शनचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या पथकाने पौड पोलिस ठाण्यात सापळा लावला. पंचासमक्ष खातरजमा करण्यात आली. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता पौड पोलीस ठाणेअंतर्गत मुळशी बीटच्या कार्यालयात तक्रारदाराकडून 35 हजाराची लाच घेताना सहाय्यक फौजदार शिंदे याला पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे या करीत आहेत.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप