सोलापूर : पुणे महामार्गावर विद्यापीठाजवळ शनिवारी सकाळी साडेसात वाजता भरधाव जाणाऱ्या कारने पुढील रिक्षाला धडक दिल्याने रिक्षातून प्रवास करणारी गंभीर जखमी झालेली एक विद्यार्थिनी उपचारादरम्यान मरण पावली तर तिच्या मैत्रिणीवर उपचार सुरू आहेत.
सोलापूर-पुणे महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर कारने रिक्षाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अकरावीत शिकणारी भाग्यश्री निवृत्ती कांबळे (वय 17, रा. कोंडी) हिचा मृत्यू झाला. ती कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी न एमएच १३, सीटी ९४७९ या क्रमांकाच्या रिक्षातून जात होती. पुण्याकडून सोलापूरकडे निघालेल्या कारने या रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा पाठीमागे बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी बाहेर फेकली गेली. रिक्षातून पडल्याने भाग्यश्री ती रस्त्यावर आपटली. यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (वय: १९) हीसुद्धा गंभीर जखमी झाली आहे. या दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर भाग्यश्री ही उपचारादरम्यान मरण पावली. भाग्यश्री ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. तिचे वडील शासकीय कर्मचारी आहेत व त्यांना फक्त दोन मुलीच आहेत. त्यापैकी भाग्यश्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अपघाताची मिळतााच शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप