सोलापूर: महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशवर काम करण्याची संधी दिली आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड येथील त्यांच्या निवासस्थानी किसन जाधव यांना प्रदेश उपाध्यक्ष निवडीचे पत्र दिले. या निवडीबद्दल किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, जनसामान्यांपर्यंत, पोहचवून, पक्षाची ताकद वाढविण्यासह, अजित पवार यांचे हात बळकट करण्याचा विश्वास किसन जाधव यांनी व्यक्त केला. किसन जाधव हे अजित पवार गटाचे एकनिष्ठ असून त्यांनी सोलापुरात पक्ष बांधण्यासाठी आतापर्यंत मोठे काम केले आहे. संघटन कौशल्यामुळे त्यांनी शहरातील अनेक नेत्यांना जोडले आहे. नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांनी विकास कामे करीत लोकप्रियता मिळवली आहे. यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध