सोलापूर: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 अक्कलकोट ते नळदुर्ग या महामार्गात शेतजमिनी बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी महामार्गावर एकत्र येत एल्गार पुकारला आहे. बाधित शेत जमिनीचा मोबदला तात्काळ मिळावा या मागणीसाठी मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी अक्कलकोट तहसीलसमोर हे शेतकरी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
अक्कलकोट ते नळदुर्ग महामार्गाच्या कामासाठी बाधित शेतकऱ्याचा मोबदल्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील रविवारी महामार्गावर एकत्र आले. राष्ट्रीय महामार्गा च्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विरोध असताना महामार्गाचे काम कसे पूर्ण केले, रस्त्याच्या मध्ये असलेल्या वडाच्या झाडांची कत्तल करून त्या झाडांचे पुनर्रोपन करता अवशेष फेकून दिले, त्याचा उपयोग लोक जळण्यासाठी करत आहेत. महामार्गात बाधित शेतकऱ्याच्या शेतजमिनी कवडीमोल लोटल्या गेल्यात. महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीची कवडी दिलेले नाही. बाधित जमिनीची मोजणी करताना राष्ट्रीय महामार्ग व भूसंपादन अधिकारी, महसूल विभाग हेराफेरी केल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात शेतकरी अशी स्थिती कायम असून आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ जानेवारी रोजी अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.