सोलापूरसामाजिक

एसटी महामंडळातील 43 उमेदवारांना चार वर्षानंतर मिळणार नियुक्तीपत्र

सकल मराठा समाजाच्या पाठपुराव्याला मिळाले मोठे यश

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीप्रमाणे 43 उमेदवारांची लेखी परीक्षा संगणकीकृत वाहन चालक चाचणी प्रशिक्षण, मेडिकल सर्व झाले मात्र अद्याप चार वर्षापासून त्यांना सेवेचे नियुक्तीपत्र सोलापूर आगाराकडून दिले नसल्याची माहिती मिळाल्यावर सकल मराठा समाजाने पाठपुरावा केल्यानंतर त्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या 43 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नसल्याची तक्रार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी केली होती. यानुसार पवार यांनी याबाबतचा पाठपुरावा केल्याने तब्बल 1 वर्षानंतर या सर्व उमेदवारांना न्याय मिळाला आहे. मंगळवार दि. 9 जानेवारी रोजी या 43 उमेदवारांना महामंडळाकडून नियुक्तीपत्र मिळणार आहे.या कर्मचार्‍यांना त्वरित नियुक्तीपत्र देण्याबाबत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा करून त्यांना न्याय द्यावा असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले होते. आमदार कल्याण शेट्टी व माऊली पवार यांनी याबाबत पाठपुरावा केला. इतकेच काय तर पवार हे एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातील अधिकार्‍यांना आणि पुण्यातील अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. यामुळे त्यांचे काम मार्गी लागले. उमेदवारांनी चालक पदासाठी 48 दिवसाचे तर वाहक पदासाठी 15 दिवसाचे सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या उमेदवारांना प्रतीक्षा फक्त नियुक्ती पत्राची होती. राज्यातील 591 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.आता या 43 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याने त्यांनी पवार यांच्याकडे येवून आपला आनंद द्विगुणीत केला. यावेळी माऊली पवारसह सकल मराठा समाजाचे नेते राजनभाऊ जाधव, नानासाहेब काळे, प्रकाश डांगे, प्रशांत देशमुख, विनोद भोसले प्रा. गणेश देशमुख, बाबा डोंगरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button