सोलापूर : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने जप्त केलेल्या 24 वाहनांचा ई-लिलाव दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, ऑटोरिक्षा गुडस या वाहनांचा समावेश आहे. जप्त वाहने चिंचोळी एम.आय.डी.सी येथील आवारात दि. 31 जानेवारी ते दि. 13 फेब्रुवारी या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहिर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 31 जानेवारी ते दि. 13 फेब्रुवारी या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे खटला विभागात सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यके वाहनांसाठी 50 रूपये रकमेचा DY RTO SOLAPUR या नावे अनामत रकमेचा डीमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी अप्रुव्हल करून घेणे गरजेचे आहे.
लिलावाचे अटी व नियम दि.30 जानेवारी 2024 पासून कार्यालयीन कामकाजाच्यादिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथील नोटीस बोर्डावर सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. सदर वाहने जशी आहेत तशी या तत्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विकली जातील.कोणतेही कारण न देता सदर जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, सोलापूर यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.