सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण
बापरे… ‘माध्यमिक’ मध्ये एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक फायली निकाली
वेळ काढून केलेल्या कामाचे होतेय कौतुक

सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागात मंगळवारी रेकॉर्ड ब्रेक फाईली निकाली निघाल्या आहेत.
आजारपणामुळे प्रदीर्घ रजेवर गेलेले माध्यमिक शिक्षण अधिकारी मारुती फडके हे मंगळवारी सायंकाळी कामावर हजर झाले. जाता जाता त्यांनी इनवर्ड व आउटवर्ड नोंदलेल्या फायली क्लोज केल्या. प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी फडके यांच्या रजेच्या काळात चांगले काम केल्याचे कौतुक होत आहे. कामाच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी बऱ्याच फायली हातावेगळ्या केल्या. अंधारे यांनी टप्पा अनुदान आलेल्या माध्यमिक शाळांच्या शालार्थ आयडीची प्रकरणे बरीच मार्गी लावली आहेत. त्यामुळे माध्यमिक शिक्षणा विभागात येणारा शिक्षकांचा लोंढा थांबला आहे. माध्यमिक शिक्षण विभागात नेहमीच गोंधळ असायचा पण आता अंधारे यांच्या कामकाजामुळे बदल दिसत आहे. आता त्यांच्याकडे प्राथमिकची जबाबदारी देण्यात आली आहे.