सोलापूर : महापालिकेचे राजकारणात एकेकाळी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश पाटील यांना भाजपची साथ सोडल्यानंतर केवळ 17 मताने पराभवाचा दणका बसला. तरीही नाउमेद न होता जुन्या मित्रांना सोबत घेऊन मुलाचा संसार सुखी करण्यासाठी सुरेश पाटील यांनी आता व्यवसायात उडी घेतली आहे. महापौर विनायक कुंडल यांच्या हस्ते या नवीन व्यवसायाचा शुभारंभ त्यांनी नुकताच केला.
हैदराबाद रोड परिसरात खवय्यांसाठी आणखी एक नवे आकर्षण निर्माण झाले असून ‘कोमल सावजी’ या हॉटेलचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी सोलापूरचे महापौर विनायक दादा कोंड्याल,श्री सद्गुरु बसवारुढ मठाचे मठाधिपती अभिनव शिवपुत्र आप्पाजी, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्याहस्ते उत्साहात पार पडले. यावेळी परिसरातील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल यांनी हॉटेलच्या संचालकांना शुभेच्छा देत सांगितले की, शहरात उत्तम आणि स्वच्छ खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देणारी अशी हॉटेल्स उभी राहणे ही आनंदाची बाब आहे. ‘कोमल सावजी’ हॉटेलच्या माध्यमातून दर्जेदार व चविष्ट सावजी खाद्यपदार्थ खवय्यांना उपलब्ध होणार असून, या ठिकाणी कुटुंबियांसह जेवणाचा आनंद घेण्यासाठी उत्तम वातावरण निर्माण करण्यात आले आहे हॉटेलमध्ये पारंपरिक सावजी चवीसोबतच विविध प्रकारचे रुचकर पदार्थ, प्रशस्त आसनव्यवस्था आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच भविष्यात खवय्यांसाठी विशेष खाद्य महोत्सव, विविध कार्यक्रम तसेच मैफिली आणि छोट्या सभांचे आयोजन करण्याचीही योजना हॉटेल व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या हॉटेलमुळे परिसरात केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे तर सामाजिक संवादाचेही एक नवे केंद्र निर्माण होणार आहे.
यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक किसन जाधव, बिज्जू प्रधाने, प्रथमेश कोठे, सतीश सिरसीला, अविनाश दासरी, विजय रामपुरे, नगरसेवक अक्षय अंजीखाने, विजय साळुंखे, अशोक कटके, सरपंच विजय राठोड, मनोज राठोड, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे,माजी सभागृह नेते सुरेश पाटील, हॉटेल मालक संदीप पाटील, विजय पुजारी, गणेश मगणुर, नगरसेवक अक्षय अंजीखाने, शशिकांत थोरात, मनोज राठोड, संजय होमकर, सुदीप चाकोते, अशोक निंबार्गी, महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, जय साळुंखे, सागर अतनुरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
हॉटेल मालक पाटील यांना वडील तथा माझी सभागृह नेते सुरेश पाटील यांचे प्रोत्साहन आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सुरेश पाटील यांचा केवळ 17 मतांनी पराभव झाला. भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी स्वकर्तुत्वावर निवडणूक लढवली. पण थोड्याच फरकाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने खचून न जाता मुलाच्या पाठीशी उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या कार्यक्रमात त्यांची ही धडपड दिसून आली. भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली तर त्यांनी आपल्या पूर्वीच्या मित्रांना सोबत घेऊन व्यवसायाचा शुभारंभ केला.

More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी