सोलापूरक्राईम

नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार स्वीकारला

आम जनतेची सुरक्षा व स्पीड क्राईमवर लक्ष ठेवणार

सोलापूर : नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी मावळते पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.

सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे सोमवारी दुपारी पोलीस आयुक्तालयात जळगावहून आगमन झाले.  मुख्यालय पोलिसांनी मानवंदना देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मावळते पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडून एम राजकुमार यांनी सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.  त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गेल्या दहा वर्षातील सोलापुरातील गुन्हेगारीचा आढावा घेऊन त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना केल्या जातील.  आम जनतेची सुरक्षा व स्पीड क्राईमवर लक्ष ठेवले जाईल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button