सोलापूर : मंद्रूपचे अप्पर तहसीलदार म्हणून सुजित नरहरी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमधील जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात मंद्रूपचे अप्पर तहसीलदार म्हणून सुजित नरहरी यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे नरहरी यांनी सोमवारी अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे उपस्थित होते. मंद्रूपला अप्पर तहसील कार्यालय झाल्यापासून तिसरे अप्पर तहसीलदार म्हणून नरहरी यांनी पदभार घेतला आहे. अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी आपल्या कारकीर्दीत चांगला कारभार केला. शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत त्यांनी मंद्रूप व विभागात मोठे उपक्रम हाती घेत सामान्य नागरिकांना विविध दाखले व प्रमाणपत्र वितरण केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्व जिल्ह्यामुळे त्यांना आता सोलापुरातून जावे लागत आहे. अध्याप त्यांची पोस्टिंग झालेली नाही.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप