सोलापूर सोलापूरच्या राजकारणात दादा म्हणून ओळख असलेल्या आनंद चंदनशिवे यांची 14 फेब्रुवारीपासून नवी ओळख निर्माण झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, त्यांचे खंदे समर्थक व माजी  नगरसेवक गणेश पुजारी या दोघांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे भेट झाल्यानंतर माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा होऊन येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटन मजबूत करणे व राष्ट्रवादी पार्टीचा विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर पक्ष प्रवेश करण्यासंदर्भात सूचना दिल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा व प्रदेश अध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत आनंद चंदनशिवे ,गणेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे तसेच चंद्रकांत सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व सदस्यांच्या गळ्यामध्ये शाल घालून प्रवेश देण्यात आला.

यावेळी अजितदादांनी पुढील कार्यासाठी आनंददादांना शुभेच्छा दिल्या. सोलापूर शहरासाठी प्राधान्याने लक्ष ठेवून पक्षीय स्तरावर सर्व कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *