सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्डी ग्रामपंचायतीच्या स्थापनेस शुक्रवारी ८२ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांच्यावतीने सरपंच प्रांजली पवार व उपसरपंच श्रीकांत मार्तंडे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातील ग्रामपंचायत कार्यालयावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जेष्ठ व्यापारी प्रकाश केकडे यांच्याहस्ते पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर व्यापारी गोरखनाथ खेंदाड यांच्याहस्ते सरपंच पवार तर उपसरपंच श्रीकांत मार्तंडे यांचा केकडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना केकडे म्हणाले की, ग्रामपंचायतीचे व्यापाऱ्यांना कायमचे सहकार्य राहिले असून विविध उपक्रमासाठी किंवा महापुरुषांच्या जयंती, उत्सवाच्या वर्गणीसाठी गावातील मंडळाकडून आम्हां व्यापाऱ्यांना त्रास दिला जात नाही. यामुळे नेहमीच व्यापारी बांधव खूष असतात. यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी गणेश पवार, ग्रामपंचायत कर्मचारी कुंडलिक बोराडे यांचाही सत्कार करण्यात आला.

More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी