सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून शहरात 136 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्यावरुण ट्रिपलसीट, मोबाईलवर बोलताना दंड लावण्यात येत आहे.
सोलापूर शहरात दुचाकी वाहनांचे प्रमाण वाढले आहे. यात सर्वाधिक तरुण, शाळकरी व कॉलेजची मुले दुचाकी चालवताना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. दुचाकीवर ट्रिपलसीट, मोबाईल वरून बोलताना सीसी कॅमेऱ्याने टिपलेल्या चित्रीकरणावरून वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरात महत्त्वाच्या 136 चौकात बसविलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या यंत्रणेसाठी जोडलेले आहेत. या ठिकाणी बसलेले वाहतूक पोलीसाकडून वाहनधारकांवर लक्ष ठेवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ई-चलांनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 15 फेब्रुवारी रोजी या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे मोबाईल टॉकिंगचे 53, ट्रिपल सीटचे 33 असे एकूण 86 ई-चलनाचे केसेस करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने रामलाल चौक, अशोक चौक, सात रस्ता, चार हुतात्मा चौक या भागातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना या कारवाईचा दणका बसला आहे. त्यामुळे यापुढे शहरातील महत्त्वाच्या चौकातून जाताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन कराल तर दंडास पात्र ठराल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.