सोलापूर : फेब्रुवारी -मार्च 2024 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेवर विविध मागण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी घातलेला बहिष्कार पुणे बोर्डाच्या अध्यक्ष मंजुषा मिष्कर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला आहे.
शिक्षण विस्तार जिल्हा संघटनेने 9 फेब्रुवारी रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी पुणे विभागाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी शिष्टाई करून बैठकीचे पत्र दिलेले होते. त्यानुसार गुरुवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर पुण्यात बैठक झाली. परीक्षा मंडळाकडे असणाऱ्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरित मागण्या राज्य मंडळाची मान्यता घेऊन सोडवण्यात येईल असे आश्वासन पुणे विभागाच्या अध्यक्षा मंजुषा मिस्कर यांनी दिले आहेेत. दर वर्षापेक्षा यावर्षी परीक्षा सुरक्षित व कडक वातावरणात वस्तुनिष्ठपणे पार पाडावेत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडावेत, असे आवाहनही त्यांनी केले
यावेळी सचिव औदुंबर उकिरडे यानी सर्व केंद्र संचालक, परिरक्षक, शिक्षक यांना विश्वासाने ही जबाबदारी सोपवलेली आहेत. ती काळजीपूर्वक करावी. जिथे गैरप्रकार होतील त्या केंद्र संचालकावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला.
या बैठकीत पुढील मागण्या मान्य करण्यात आल्या. गोपनीय साहित्य संध्याकाळी 7 पूर्वी पोहोच करण्यात येईल अशी व्यवस्था केलेली आहे.सर्व माध्यमिक शाळा परीक्षा केंद्रांना संबंधित मुख्याध्यापक यांन हकार्य करावे, याबाबत पत्र देण्यात आले असून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.परीरक्षण केंद्राला कर्मचारी वाढ करण्याबाबत व मानधन वाढ करण्याबाबत राज्य मंडळाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. मंजुरीअंती परीरक्षण केंद्राला अनुदान वाढीची कार्यवाही करण्यात येईल.परीक्षा संपल्यानंतर रिकाम्या पेट्या व शिल्लक साहित्य एक आठवड्याच्या आत परत नेण्याची कार्यवाही करण्यात येईल.सर्वांना परीक्षा कामी येणाऱ्या कर्मचारी यांचेकडून व्यवस्थित सहकार्य करण्यात येईल .लेखा विभागासह सर्वांना तशा सूचना निर्गमित होतील. संवेदनशील परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा व भरारी पथकाची निगराणी राहील. काही तांत्रिक अडचणी आल्यास बोर्डाकडे सूचना कराव्यात त्यानंतर त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल असे अध्यक्ष मंजुषा मिस्कर यांनी सांगितले
याप्रसंगी सह सचिव मीनाक्षी राऊत, वैशाली काळे लेखाधिकारी व इतर सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.संघटनेच्यावतीने अध्यक्ष बापूराव जमादार,सचिव विकास यादव यांनी निवेदनातून अनेक वर्षांपासूनच्या अडचणी मांडल्या. याबाबत बोर्डाचे अध्यक्ष व सचिव यांनी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढल्याबद्दल बिभीषण रणदिवे यांनी आभार मानले. राज्य संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र आंधळे यांनी याप्रसंगी उर्वरित प्रशासन स्तरावरील मागण्यांबाबत शिक्षण आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून निवेदनाद्वारे विस्तार अधिकारी यांचे प्रवास भत्ते बिलाबाबत शासनाकडे राज्य अध्यक्षा प्रतिभा भराडे व सहकारी मंडळींकडून पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले. याप्रसंगी बंडू शिंदे, सुयोग नवले, मारुती लिगाडे यांचेसह राजकुमार पाटील, सुहास गुरव, बापू करडे, अथर डफेदर, रतीलाला भुसे, प्रशांत अर्बाले आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष बापूराव जमादार यानी जिल्हास्तरावरील बैठकीत उर्वरित मागण्यांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांचे मार्फत लवकरच चर्चा होणार असल्याने कार्यकारिणी सभेमध्ये ठरल्यानुसार परीक्षेवरील बहिष्कार स्थगित करण्यात आल्याचे सांगितले