सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मंद्रूप येथे बैठक होऊन संघाच्या अध्यक्षपदी संचारचे बातमीदार पंचाक्षरी स्वामी यांचे बिनविरोध निवड करण्यात आली
पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी बैठकीत नूतन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला.यावेळी पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची एकमताने निवड करण्यात आली. इतर पदाधिकारी असे. उपाध्यक्ष: महासिध्द साळवे (सकाळ), सचिव: नितीन वारे (लोकमत), कार्याध्यक्ष: शिवराज मुगळे (पुढारी), कोषाध्यक्ष: दिनकर नारायणकर,प्रसिध्दी प्रमुख: बबलू शेख, संघटक: आनंद बिराजदार, सहसचिव: अप्पू देशमुख व अशोक सोनकंटले, कार्यकारिणी सदस्य: महेश पवार, गजानन काळे, बनसिद्ध देशमुख, अभिजीत जवळकोटे, शिवय्या स्वामी, प्रमोद जवळकोटे, बिरु रूपनुरे, कलय्या स्वामी,शिवसिध्द कापसे, संगय्या स्वामी, आरिफ नदाफ, अंबादास कापसे, सल्लागार: विजय देशपांडे, नारायण चव्हाण, राजकुमार सारोळे, अमोगसिध्द लांडगे, विनोद कामतकर, नंदकुमार वारे, समीर शेख. नूतन पदाधिकाऱ्यांचा पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

More Stories
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार