सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा मतदारसंघातील एकही मतदार टपाली मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी काळजी घेऊन या प्रशिक्षणात अत्यंत सूक्ष्मपणे टपाली मतदान प्रक्रिया समजून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

टपाली मतदान पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सर्व टपाली मतदान प्रक्रियेत नेमणूक करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, त्यांना प्रशिक्षण देताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,अतिरिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,टपाली मतदान प्रक्रिया नोडल अधिकारी व सदरील सर्व प्रक्रियेत नियुक्त अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते .

टपाली मतदान प्रक्रिया कशी राबविण्यात यावी याबाबत नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व फलटणचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सदरील टपाली मतदान प्रक्रिया ही जे शासकीय कर्मचारी आहेत व इतरत्र कार्यरत आहेत, जे 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे जेष्ठ नागरिक आहेत, कोविड बाधित असणारे नागरिक, दिव्यांग व्यक्ती व मतदानादिवशी अत्यवश्यक सेवेत असणार आहे, त्यांच्याकरिता राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले . तसेच सदरील सेवा पाहिजे असल्यास पात्र मतदारांनी 12 D अर्ज भरून निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर 5 दिवसाच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत पोचविण्यात यावे हे आवश्यक आहे .सदरील अर्ज हे BLO व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रकशित करण्यात येणार आहेत. मतदानाच्या 3 दिवस आगोदर सदरील सेवेकरिता केंद्र टपाली मतदान प्रक्रिया करिता कार्यान्वित असणार आहेत. त्यामुळे सर्व पात्र मतदान करणाऱ्या मतदारांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे. यासाठी कार्यरत कर्मचारी यांनी प्रयत्न करण्याबाबत सूचनाही करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *