सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता पाटील यांनी पदभार सोडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे जलजीवनच्या कामाला गती मिळाली. अशात पुन्हा सीईओ आव्हाळे यांनी उपाभियंता कटकधोंड यांच्याकडे समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता म्हणून अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. हा पदभार पंढरपूर गटसधन केंद्राचे कनिष्ठ अभियंता मदनसिंह पताळे यांच्याकडे होता. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासनाने महाळुंगला अभ्यास केंद्र मंजूर केले आहे. या अभ्यास केंद्राच्या इमारत बांधकामाचा सुमारे 30 लाखाच्या टेंडरवरून किरकिर सुरु होती. अशात हाताखाली कर्मचारी नसल्यामुळे पताळे यांची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे त्यांनी 26 मार्च रोजी हा पदभार सोडण्याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यावरुन सीईओ आव्हाळे यांनी त्यांचा पदभार काढून कटकधोंड यांच्याकडे दिला आहे. पहा कोणा कोणाचा बदलला पदभार…….