पंढरपूर : खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर केंद्र आणि राज्यशासनाच्या मदतीने उजनी धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेवून जिल्हयाच्या कानाकोपर्यापर्यंत उजनीचे मुबलक पाणी पोहोचविणे तसेच स्थानिक तरुणांना सोलापुरातच काम निर्माण करण्याच्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असून सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघातून भाजपाच्या दोन्ही उमेदवाराना मोठया मताधिक्याने विजयी करावे, असे अवाहन आमदार राम सातपुते यांनी पंढरपूरात झालेल्या शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात केले.
शिवसेनेचे संंपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने माढा व सोलापूर मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता.अध्यक्षस्थानी आमदार शहाजीबापू पाटील होते.याप्रसंगी माढा लोकसभेचे उमदेवार खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर,प्रा.शिवाजी सावंत,भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महावीर देशमुख, माजी नगरसेवक अमोल शिंदे, प्रा.बी.पी.रोंगे, शिवसेनेचे जिल्हयातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थित शिवसैनिकांनी माढयातून खा.रणजितसिंह निंबाळकर व सोलापूरातून आ.राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे अश्वासन याप्रसंगी दिले
आमदार राम सातपुते म्हणाले, मी उसतोड कामगाराचा मुलगा असून दुष्काळ काय असतो ते मी अनुभवले आहे.सोलापूर जिल्हयाला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्यासाठी मी स्वतः खा.रणजितसिंह निंबाळकर,आ.शहाजीबापू पाटील यांनी अथक प्रयत्न केले आहेत. सोलापूर जिल्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब होती मात्र मोदी सरकारने या जिल्हयात 40 हजार कोटींचे रस्ते केले.सोलापूर,पंढरपूर शहराला जोडणारे सर्व रस्ते चकचकीत झाले असून आमच्या मायमाउलींच्या डोक्यावर असलेला पाण्याचा हंडा उतरविण्यासाठी एक हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशनव्दारे पिण्याचे शुध्द पाणी मिळालेले आहे.घरातील चुल काढण्यासाठी मोदी यांनी सोलापूर जिल्हयातील दोन लाख घरात उज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडण्या दिल्या आहेत.ही निवडणूक सोलापूर जिल्ह्याचे व देशाचे भवितव्य ठरविणारी असल्याने मोदीं यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपास मते दया असे अवाहन आ.सातपुते यांनी याप्रसंगी केले.
प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले शिवसेना व भाजपाच्या कार्यकत्यांनी एकत्रितपणे हातात हात घालून काम करणे गरजेचे असून भाजपाचे दोन्ही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार याबाबत कोणतीही शंका नाही. परंतु निवडून आल्यावर त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांप्रमाणे शिवसैनिकांना जवळ घेवून त्यांचीही कामे करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
पवारांमुळे पंढरपूर रेल्वेमार्ग रखडला
माढा मतदारसंघातून निवडून गेलेल्या शरद पवार यांनी या भागातील जनतेला फसविण्याचे काम केले. उजनीचे पाणी बारामतीला पळविले. मी व आ.शहाजीबापू पाटील यांनी ते पाणी पुन्हा जिल्हयाला मिळवून दिले.बारामती, पंढरपूर रेल्वे मार्गासही पवारांनी विरोध केला.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास विरोध केला त्यांमुळे या मार्गाचे काम रखडले.