सोलापूर : भाजप व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या ‘सेल्फी विथ यु” या प्रयोगाला तरुणांची मोठी पसंती मिळत आहे. शनिवारी ते दक्षिण सोलापूरच्या दौऱ्यावर असताना कंदलगाव येथील झाडाखालचा कट्टा पाहून त्यांनी कार्यकर्त्यांना मी कट्ट्यावर उभे राहतो तुम्ही या मागे…. असे म्हणत कट्ट्यावर चढून त्यांच्यासोबत सेल्फी घेतली.

गेल्या ६५ वर्षांपासून विकासाचा कोणताही दृष्टिकोन नसलेली राहुल गांधीं यांची काँग्रेस भाजपवर टीका करत आहे. देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल, असा घणाघात भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला. लोकसभा निवडणूकीसाठी शनिवारी दक्षिण सोलापूर विधानसभेत आयोजित गाव भेट दौऱ्यावेळी कंदलगाव येथे झालेल्या सभेत आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, जिल्हा नियोजन समिती सदस्य आप्पासाहेब पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. चनगोंडा हविनाळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, अण्णाराव बाराचारे, प्रशांत कडते, प्रकाश कोरे उपस्थित होते.

आमदार राम सातपुते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात ४० हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत हिंडत आहेत ते सर्व रस्ते भाजपा खासदारांच्या पुढाकाराने बांधण्यात आले आहेत. काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी म्हणत असत की दिल्लीतून एक रुपया पाठवला तर जनतेला १५ पैसे मिळतात. याचा अर्थ भ्रष्टाचार होत असल्याचे ते स्वतःच मान्य करीत. परंतु सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतून सहा हजार रुपये पाठवले तर ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होतात हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. अशा अनेक प्रकारच्या पारदर्शक कारभारामुळेच जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आमच्या १० वर्षांचा हिशोब मागणाऱ्या काँग्रेसने गेल्या ६५ वर्षात सोलापूर शहर जिल्ह्यासाठी काय केले हे जनतेसमोर मांडावे, असे आव्हानही भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विरोधकांना दिले.

दरम्यान, शनिवारी उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेतील सोरेगाव, वडगबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी आणि कंदलगाव या गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली. याप्रसंगी शेतकरी आणि नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामाला आम्ही मतदान करणार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली.

याप्रसंगी भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस दिपाली होनमाने, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, महादेव होनराव, महादेव व्हनमाने, गौरीशंकर मेंडगुदले, भीमाशंकर बबलेश्वर, आप्पासाहेब मोटे, सोमलिंग कमळे, प्रभाकर बिराजदार, प्रशांत सलगरे, गावडेवाडीच्या सरपंच संगीता पांढरे, सुरज खडाखडे, वडगबाळचे उपसरपंच राहुल पुजारी, शीतल गायकवाड, धीरज छपेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *