रेशन दुकानांना येणाऱ्या धान्यात मारला जातोय काटा
उत्तर तहसील कार्यालयात रेशन दुकानदारांनीच केली पोलखोल

सोलापूर : उत्तर सोलापूर तहसील कार्यालयमार्फत रेशन दुकानदारांना पुरविण्यात येणाऱ्या धान्याच्या पोत्यात दोन ते तीन किलोचा काटा मारण्यात येत असल्याचा आरोप रेशन दुकानदारांनी तहसीलदारासमोर केल्याने खळबळ उडाली आहे.
उत्तर तहसील कार्यालयाने शुक्रवारी रेशन दुकानदारांची बैठक घेतली. या बैठकीत रेशन दुकानदारांनी आपल्या अडचणी मांडल्या. रेशन प्रणालीत पारदर्शकता याव म्हणून शासन वेळोवेळी अनेक योजना आमलात आणत आहे. दुकानदारांनी हा बदल स्वीकारून कात टाकली आहे. आयएसओ मानकन, ऑनलाईन प्रणाली, पॉस मशीन अश्या अनेक गोष्टीचा सद्या रेशन वापर आहे. धान्य वाटपात सुरळीतपणा यावा यासाठी उत्तर तालुका तहसील कार्यालयेयात ही बैठक झाली. या बैठकीत दुकानदारांनीच संबंधित अधिकाऱ्यां-अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने होत असलेल्या त्रासाचा पाडा वाचला. युनिट कमी-जास्त करणे, दुबार कार्ड, नवीन अन्नसुरक्षा मंजुरी न करणे ,मंजूर कोट्या पेक्षा वीस टक्के धान्य कमी देणे, तसेच 50 किलोच्या प्रति पोत्यामागे 2 ते 3 किलो वजन कमी देणे असा गौडबंगाल सद्या उत्तर तहसील कार्यालयात चालू असल्याचा आरोप रेशन दुकानदारांनी यावेळी केला. इतर वेळी अनेकदा ग्राहकांच्या रडारवर असणारा रेशन दुकानदारांनीच अधिकाऱ्यांची पोलखोल तहसीलदारासमोर केली.रेशन दुकानदारांना काळया बाजारात तोंड वर करता येऊ नये यासाठी प्रशासन अनेक बाजूने मुसक्या आवळत असतानाही चक्क गोडाऊन कीपर,नायब तहसीलदार,पुरवठा निरीक्षक, लिपिक यांच्यात ताळमेळ नसल्याने ह्याचा फटका दुकानदारांना बसत असल्याच्या तक्रारी तहसील अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. या तक्रारीमुळे उतर तहसील कर्मचाऱ्यात यापुढे सुधारणा होणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.वारंवार दुकानदारांवर अन्याय होत असेल तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा रेशनदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर यांनी यावेळी दिला. वजनाप्रमाणे धान्य कमी येत असल्यास दुकानदारांनी धान्य उतरवून घेऊ नये,अशी सूचना तहसीलदार निलेश पाटील यांनी दुकानदारांना केली.
रेशन दुकानदारानी धान्य वाटपात पारदर्शकता आणली आहे. त्यात गोडाऊनमधून कमी वजन आल्यामुळे ग्राहक व दुकानंदारात तक्रारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धान्य कमी येत असल्यास दुकानदारांनी संघटनेशी संपर्क साधावा.
नितीन पेंटर, जिल्हा संपर्क प्रमुख