सोलापूर : जीवनात येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राचे स्मरण करा. छत्रपती शिवरायाचे जीवनचरित्र आपले जीवन सुखाने जगण्यासाठीचे बुस्टर आहे, असे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी  मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, महिला व बालकल्याण अधिकारी प्रशांत मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी कादर शेख, सचिन जगताप, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, संजय पारसे उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी शिवरायांच्या जिवनचरित्रावर मार्गदर्शन केले.

मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्यावतीने दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत पाल्याचा सन्मान, तसेच सेवानिवृत्त वेतन प्रकरणे जलद गतीने मंजूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अधिक्षक अनिल जगताप, सुधाकर देशमुख , चेतन वाघमारे, चेतन भोसले,अजित देशमुख, श्रीकांत धोत्रे,आदम नाईक,राम जगदाळे यांनी परिश्रम घेतले.  यावेळी  वाय. पी. कांबळे,गिरीश जाधव,नागेश पाटील,विवेक लिंगराज,तसेच जिल्हा परिषद येथील सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संभाजी आरमारचे श्रीकांत  डांगे व  वाघमोडे यांचा गौरव अतिरिक्त सीईओ कोहिणकर यांचेहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले तर महताब शेख यांनी आभार मानले. यावेळी स्वानंद टीचर्स ग्रुपने शिवगीत सादर केले.

श्रावणी सुर्यवंशी हिचा सन्मान

इंडोनेशिया येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेबद्दल अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांचेहस्ते सन्मान करणेत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *