सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील शंभर मोठ्या गावात सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी गावाशेजारी ‘फिल्टर पॉंड्स” उभारण्यात येणार आहेत.
- गावातील सांडपाणी गटारीद्वारे एकत्र होऊन गावाशेजारी असलेल्या एका डबक्यात साठते. घाण सांडपाणी साठत राहिल्याने अशा डबक्यातून कालांतराने दुर्गंधी सुटते व पावसाळ्यात या डबक्यातून पाणी नाल्याद्वारे वाहत नद्यांमध्ये येते. यामुळे नद्यांमधील पिण्याचे पाणी बाधित होत असते. मोठ्या गावामध्ये सांडपाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गावा शेजारचे ओढे, नाले, तलाव प्रदूषित होत असल्याने शासनाच्या स्वच्छता विभागाने असे सांडपाणी गावाशेजारीच शुद्ध करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे नगरपालिका महानगरपालिका स्तरावर सांडपाणी ड्रेनेज लाईन द्वारे जमा करून त्याचे शुद्धीकरण केले जाते पण गावांकडे ही यंत्रणा नाही त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजाराच्या पुढील गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे छोट्या गावामध्ये सांडपाणी नाणे घराजवळच फिल्टर बेड करून शुद्ध करण्याचे यंत्रणा यापूर्वीच राबवली आहे त्यामुळे छोट्या गावातील सांडपाण्याचे प्रदूषण कमी झाले आहे आता मोठ्या गावातील सांडपाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी गावाशेजारी फिल्टर पॉंड्स तयार करण्यात येणार आहेत.
- ज्या गावांची लोकसंख्या 5000 च्या पुढे आहे अशा गावांमध्ये जमा झालेले सांडपाणी गावाशेजारी विहिरीसारखा छोटा तलाव निर्माण करून त्यात फिल्टर बेड तयार केले जाणार आहेत फिल्टर बेड मध्ये खडी वाळू विटा यांचा वापर केला जाणार आहे यामुळे सांडपाणी या पॉंड्स मध्ये सोडल्यानंतर त्याचे शुद्धीकरण होऊन हे पाणी पुढे जाणार आहे.
शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागास तर्फे सोलापूर जिल्ह्यात अशी योजना राबविण्यासाठी 40 संस्थांची नियुक्ती केली आहे. 5 हजारच्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावात सांडपाणी शुद्धीकरणाची ही योजना राबविण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांमध्ये प्राधान्याने ही योजना राबविण्यात येईल. यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे.
अमोल जाधव,