सोलापूर : जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये राज्यातील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊनही नियुक्तीपत्र दिलेले नाही. यासाठी उमेदवार जिल्हा प्रशासन आणि शासनाकडे पाठपुरावा करत होते. दरम्यान, जिल्ह्यातील काही उमेदवारांनी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. त्यावर तत्परता दाखवून पालकमंत्री पाटील यांनी या संदर्भातील योग्य ते आदेश संबंधित खात्याला दिल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली.
माऊली पवार यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे पर्यवेक्षक उमेदवारांनी कृतज्ञता म्हणून पवार यांचे आभार मानले.याप्रसंगी शिवाजी चापले, दादा सुरवसे, अजित बनसोडे, रोहित भोसले उमेदवार निलेश पवार, भालचंद्र शिंगाडे, स्वानंद घेवारे, अमोल भिसे, अमोल गोरे, अभिजीत मासाळ उपस्थित होते. जिल्ह्यातील बऱ्याच पशुधन केंद्रावर जनावराचे डॉक्टर नियुक्त नाहीत. त्यामुळे खाजगी डॉक्टरांची चलती आहे. जिल्ह्यात पशुधन वाढले आहे त्यामुळे जनावरांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे खाजगी डॉक्टरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे सरकारी दवाखान्यावर नव्याने नियुक्त झालेल्या डॉक्टर हजर झाल्यावर शेतकऱ्यांची चांगली सोय होणार आहे जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाने याबाबत तत्परता दाखवावी असे सूचना पालकमंत्र्यांनी केल्याचे सांगण्यात आले आहे.
जनावराच्या डॉक्टरांना लवकरच नियुक्ती मिळणार

More Stories
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार