सोलापूर : आषाढस्य प्रथम दिवसे सोलापुरात आनंद घडले आहे. पावसाने जोरदार एंट्री मारत सर्वांना सुखावले आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरिपाच्या वेगाने सुरू झालेल्या पेरण्या खोळंबल्या होत्या. तूर, उडीद, मका, बाजरी, मटकी सूर्यफूल, मूग यांच्या पेरण्या झाल्या आहेत. पण पावसाने ओढ दिल्यामुळे भुईमुगाची पेरणी लांबली आहे. वेगाने वाहणारा वारा व ऊन यामुळे जमिनीतील ओलावा हटल्यामुळे शेतकरी तिफण थांबवून ढगाकडे डोळे लावून बसले होते. शनिवारपासून आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे. आषाढाच्या पहिल्याच दिवशी पावसाने सोलापूर जिल्ह्यात पुन्हा जोरदार एंट्री मारली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. पेरणी झालेल्या पिकांना या पावसाचा मोठा फायदा झाला आहे.