मुंबई : “सरकारने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. एक जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै २०२४ महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. 15 ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलै २०२४ होती.पण, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारकडून या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली.
आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन १६ जुलै २०२४ ला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे.तसेच एक ऑगस्ट २०२४ ला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे १४ ऑगस्ट २०२४ ला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.साधारण १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट २०२४ महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या १५ तारखेला महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे.