सोलापूर:: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वारकरी यांचे समवेत पायी चालून ६५ एकर परिसरात भाविकांना देणेत येणारे सुविधांची पाहणी केली.
आमदार समाधान आवताडे यांच्या बुलेटवर स्वार होऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी 65 एकरातील सुविधांची पाहणी केली. मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी बुलेटचे सारथ्य केले तर प्रणव परिचारक यांचे समवेत राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत हे बुलेटवर स्वार झाले होते. तर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन हे देखील मुख्यमंत्री शिंदे यांचे समवेत बुलेटवारीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेट चंद्रभागा नदीवर थांबवून आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या समवेत चंद्रभागा नदीची पाहणी केली.
चंद्रभागा स्नान आणिक दर्शन विठोबाचे..
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेटवर चंद्रभागा नदीत जाऊन महिलांसाठी चेजींग रूमची पाहणी केली. सोबत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सिईओ मनिषा आव्हाळे या होत्या. विश्रामधाम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेनंतर त्यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे व पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.