सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी भंडीशेगाव येथे तापाने पण पडलेल्या वारकरी आजीला धीर देत तात्काळ औषधोपचाराची व्यवस्था केली.

श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील मुक्कामाच्या अनुषंगाने सर्व सुविधांची पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या स्वतः रविवारी मार्गावर फिरत होत्या . भडीशेगाव  येथे आल्यानंतर व्यवस्थेची पाहणी करीत असताना

यावेळी दिंडीमधील एक वृद्ध वारकरी दांम्पत्याची  पत्नी आजारी होती.तीला औषधगोळ्या सुरू आहेत पण ताप कमी होईना झाल्याने त्या वृद्धाने मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे या आल्याचेपाहताच चांगल्या औषधोपचाराच्या मदतीच्या अपेक्षेने भेटण्यासाठी जवळ आले आणि माझी पत्नी आजारी आहे, तीचा ताप कमी होईना अशी विनवणी केली असता आवळे यांनी तात्काळ आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांना बोलावून घेतले आणि त्या माऊलीच्या अंगाला हात लावून काळजी करु नकाऔषधोपचाराने बरे व्हाल  असाधीर दिला.  तसेच डॉक्टरांनात्या माऊलीला अत्यंत काळजीपूर्वक औषधोपचार करा, असे सांगितले. बराच वेळ त्या त्या आजीजवळ थांबून होत्या यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक संचालक सुधीर ठोंबरे हेही उपस्थित होते.

सीईओ आव्हाळे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांनी दक्षतेने औषधोपचार केले. सीईओ आव्हाळे यांनी त्यांच्या कामाच्या एवढया धावपळीतही वेळ काढून दाखविलेली आत्मीयता वआपुलकीबद्दल वारक-यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

त्याचबरोबर आषाढी यात्रेच्या तयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामधाम येथे त्यांचे सीईओ आव्हाळे यांनी स्वागत केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *