सोलापूर : लोकसभा निवडणुकीत ‘खटाखट” च्या घोषणेचा परिणाम आपल्याला पहावयास मिळाला. याच धर्तीवर सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीने गेल्या 24 वर्षापासून सत्तेवर असणाऱ्यांचा पराभव करण्यासाठी कपबशीचा ‘खळखळाट” दाखवण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत सन 2001 पासून सत्तेवर आलेल्या समर्थ पॅनल विरुद्ध सर्व सभासद पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीने कंबर कसली आहे. समर्थ पॅनलला शिट्टी तर परिवर्तन आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.

परिवर्तन च्या कपबशीने सभासदांमध्ये जोरदार खळखळाट माजवली आहे. सत्ताधाऱ्यांनी गेल्या कित्येक वर्षात जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांना सभासद करून घेतले नाही हा मुद्दा आपल्या निवडणूक प्रचारात घेऊन परिवर्तन चे दिनेश बनसोडे सचिन मायनाळ राम जेवरे चेतन भोसले अनिल जगताप अविनाश गोडसे सचिन येडपे वीरुपक्ष बाबासाहेब पाटील यांनी सर्व पंचायत समिती स्तरावर दौरा करून नवीन सभासद करून घेण्याची सर्वांना हमी देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे गेली पंचवीस वर्षे एक हाती सत्ता असलेल्या समर्थ पॅनलला मोठे आव्हान निर्माण झाले आहे

परिवर्तन पॅनलने आपल्या जाहीरनाम्यात अनेक बाबींचा ठळकपणे उल्लेख केला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद सोलापूरमधील कार्यरत असणारे सभासदत्वची मागणी करणाऱ्या सर्व पात्र कर्मचारी यांना सभासद करून घेणार.कर्ज मागणी online करणार. कर्जाची मर्यादा 10 लाख आणि तातडीचे कर्ज 50000 करणार. ही रक्कम भविष्यात आणखी वाढविणार. शैक्षणिक आणि वैद्यकीय कामासाठी चे कर्ज तत्काळ देण्याची व्यवस्था करणार.सध्या प्रत्येक कर्मचारी यांचेकडून 2000/- रुपये जमा केले जातात. तर प्रत्येकावर भार न टाकता घेतलेल्या कर्जाच्या फेडीसाठी विमा उतरवता येईल इतरांवर त्याचा टाकला जाणार नाही. मासिक वर्गणी विलंबाने होते ही वर्गणी तत्काळ गोळा व्हावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करू. विमा पॉलिसी कर्मचारी यांचे आई वडील आणि दोन मुले यांना कॅशलेश पद्धतीने राबविणार. अनावश्यक खर्च कमी करणार.सभासद आणि संस्था यांचं हित यासाठी निर्णय घेणार. एकाधिकार शहीचा कारभार न करता लोकशाही प्रमाणे संस्थेच्या प्रत्येक संचालक यांचे मार्फत कामकाज होईल.संघटना आणि पतसंस्था हे वेगळे आहेत त्यामुळे सर्वसमावेशक कामकाज करू. संस्थेच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविणार. परिवर्तन पॅनलने आपल्या जाहीरनाम्यात केलेल्या या घोषणांचा सभासदारांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे कपबशीचा खळखळाट वाढल्याचे दिसून येत आहे.

भाकरी फिरवली पाहिजे. कोणा एकामुळे पतसंस्था किंवा संघटना बंद पडत नाही. नव्या लोकांना पण संधी दिली पाहिजे. नवीन फळी तयार केली पाहिजे. नाही तर भविष्यात कोणी वाली नाही राहणार. अचानक नेतृत्व तयार होत नाही त्याला घडवावे लागते…सर्वाना सोबत घेऊन काम केले पाहिजे. नाही तर हम कारे सो कायदा नाही चालत.

दिनेश बनसोडे, उमेदवार, परिवर्तन आघाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *