सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तन व समर्थ पॅनल आमने-सामने आल्यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे दरम्यान राजीनामा दिलेल्या 16 सदस्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी  किरण गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकची  पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत सत्ताधारी संचालक मंडळाचे समर्थ पॅनल  तर विरोधात परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. दोन अपक्ष उमेदवारीही आपले नशीब आजमावत आहेत. चेअरमन विवेक लिंगराज यांच्या पॅनलने पतसंस्थेवर गेली 25 वर्षे एक हाती सत्ता गाजवली आहे. लिंगराज यांच्या संचालक मंडळांनी नवीन कर्मचाऱ्यांना सभासदच करून घेतले नाही हा मुद्दा आता कळीचा ठरला आहे. परिवर्तन विकास पॅनलचे अविनाश गोडसे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. पराभव समोर दिसत असल्याने राजीनामा दिलेल्या सभासदांचा मतदाराचा अधिकार रद्द करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप गोडसे यांनी केला आहे. त्यांच्या पॅनलला विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे बळ वाढल्याचे दिसून येत आहे.

पहा कोणाचे रद्द झाले अधिकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *