सोलापूर : पंधरा वर्षांपूर्वीचा सोलापुरातील कार्यक्रमाचा “तो’ फोटो पाहून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनाही समाधान वाटले. सोलापूरचे पालकमंत्री असताना केलेल्या कामाची आठवण करून देणारी ही बातमी त्यांनी संपूर्ण वाचली.
“सोलापुरात पंधरा वर्षांपूर्वी “या’ कारणासाठी फुलले होते हे चेहरे’ या मथळ्याखाली “सोलापूर समाचार’ने रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सोलापूर महानगरपालिका परिवहन खात्याच्या पंधरा वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात झालेल्या कार्यक्रमाची आठवण प्रसिद्ध केली होती. तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिका परिवहन अर्थात एसएमटी स्वावलंबी झाल्याबाबत हा कार्यक्रम झाला होता. माजी आमदार नरसय्या आडम, माजी परिवहन सभापती केशव इंगळे, तत्कालीन डेप्युटी आरटीओ तथा प्रभारी परिवहन व्यवस्थापक राजेंद्र मदने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एसएमटीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. संकटात आलेल्या परिवहन व्यवस्थेला बाहेर काढून स्वावलंबी बनवल्यामुळे सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. पण त्यानंतर गेल्या पंधरा वर्षात पुन्हा परिवहनची अवस्था बिघडली आहे. या बातमीतून या स्थित्यंतराकडे लक्ष वेधण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर यांनीही बातमी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांना शेअर केली होती. विजय दादाने ही बातमी संपूर्ण वाचून स्मायली देत लाईक केली आहे. या कार्यक्रमादिवशी विजयदादांनी सातरस्ता डेपोपर्यंत एसएमटीच्या बसमधून प्रवास करीत स्वतः तिकीटही काढले होते. त्याचाही फोटो वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी ठळकपणे प्रसिद्ध झाला होता. सोलापूरचे माजी डेप्युटी आरटीओ तथा प्रभारी परिवहन व्यवस्थापक राजेंद्र मदने यांनीही ही बातमी वाचून प्रतिक्रिया दिली आहे. पंधरा वर्षानंतर ही सोलापूर कर मला विसरले नाहीत. सोलापूरकरांचे प्रेम माझ्याबरोबर सदैव आहे. एसएमटीच्या कामगारांच्या पाठबळामुळेच मी हे काम करू शकलो. सोलापुरातील गोरगरिबांच्या सुरक्षित प्रवासासाठी एसएमटीला अजूनही वैभव मिळावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.