सोलापूर : मोहोळ शहरातील महिला डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना रविवार (दि.1) दुपारी 2 वाजता उघडकीला आली. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरचे नाव आहे

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शंकर बिराजदार (रा. डॉ. आंबेडकर चौक, मोहोळ) हे मोहोळ येथे स्टेशनरी दुकान चालवतात. त्या ठिकाणी त्यांची तीन मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर मोहोळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असुन तेथेच दुसऱ्या मजल्यावर बिराजदार कुटुंबिय राहतात. रविवारी सकाळी साडेदहा वाजेचे सुमारास दुकानामध्ये काम करण्यासाठी संतोष बिराजदार गेला होते . ते दुकानामध्ये काम करत असताना दूपारी दीड वाजेच्या सुमाराला हॉस्पिटलमधील कर्मचारी सलीम मकानदार याने संतोष बिराजदार यांना संपर्क करून मॅडमने घरामध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली

यानंतर संतोष बिराजदार हे घरी आले तेव्हा पत्नी डॉ. रश्मी यांनी घरामध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले . तेव्हा संतोष व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आतून बंद असलेला लाकडी दरवाजा तोडला व गळफासातून रश्मी यांना खाली उतरवून पुढील उपचाराकरीता मोहोळच्या  ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून डॉ. रश्मी यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. याप्रकरणी संतोष बिराजदार यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *