सोलापूर : सोलापुरात मटक्याच्या धंद्यातून एका 19 वर्षाच्या मुलाचा जीव गेला आहे. अवैध धंद्यातील टोळी युद्धामुळे सोलापुरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात असून दसऱ्यापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबा करगुळे यांनी दिला आहे.
सोलापुरात अवघ्या 19 वर्षाच्या अथर्व जाधव या मुलाचा मटकाच्या धंद्यामुळे त्याचा जीव गेला. सोलापूर शहरात मटका धंद्याच्या हद्दी वाटून घेण्यासाठी टोळीयुद्ध सुरू झालं आहे. त्यातूनच एका निष्पाप एकुलत्या एक मुलाचा खून केला गेला. अवैध धंद्यामुळे सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था इतकी खालावली असताना सुद्धा शहरात मटका उघडपणे सुरू ठेवला जात आहे. यामुळे तरुण पिढी बरबाद करायचं काम सोलापुरातील कोणात्या लोकप्रतिनिधीच्या आशिर्वादाने सुरु आहे. अशा गोष्टीला सामान्य जनता पण बघ्याची भूमिका घेत आहे. ज्याचा खून झाला तो मुलगा निष्पाप व एकुलता एक होता. त्याच्या आई वडिलांच्या वाटेला आलेलं दुःख शब्दात व्यक्त होण्या सारख नाही. शहरात चाललेली गुन्हेगारी बंद होण्यासाठी येत्या दसऱ्यापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील सर्वच डान्सबार, जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय, उघडपणे विक्री होणारी हातभट्टीची दारू असे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. अन्यथा दसऱ्यानंतर याविरुद्ध जनआंदोलन उभा करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबा करगुळे यांनी दिला आहे. त्याचबरोबर युवक काँग्रेसचेच राज सलगर यांनी अशी पोस्ट सोशल मीडियावर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

More Stories
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार