सोलापूर : जुना विडी घरकुल येथील केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमदार विजयकुमार देशमुख यांना या भागातून वीस हजार मतांचे मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करू असे भारतीय जनता पक्षाचे राजू हिबारे यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी १० प्रभाग क्रमांक येथे विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचा आयोजन करण्यात आले होते.यावेळी जागोजागी महिलांनी आमदार देशमुख यांचे औक्षण करून फटाक्यांच्या आतिशबाजीने स्वागत केले.घरकुल हा भाग ३० वर्षापासून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित होता. या भागातून आतापर्यंत निवडून आलेल्या नेत्यांनी येथील जनतेची काळजी घेतलीच नाही. फक्त निवडणुकीपुरता येथील जनतेला आश्वासन देऊन नंतर वाऱ्यावर सोडून द्यायचं हा एक कलमी कार्यक्रम येथील नेत्यानी राबविला होता. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून या भागात मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाईपलाईन, बंदिस्त ड्रेनेज लाईन, दिवाबत्ती आदींची सोय महापालिका अस्तित्वात नसताना करून घेता आली. यामुळे येथील जनता समाधानी आहे असे राजू हिबारे यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घरकुल येथील नागरिक, माता-भगिनी, कामगार वर्ग घेत आहेत. लाडकी बहीण, बांधकाम कामगार योजना, आयुष्यमान योजना, उज्वला गॅस योजना,कोणत्याही तारणाशिवाय उद्योग- व्यवसायासाठी कर्ज आदी योजनांचा लाभ मिळाला. यामुळे येथील नागरिक महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागे असल्याचा विश्वास ब्रह्मदेव गायकवाड आणि रुपेश भोसले यांनी व्यक्त केला.यावेळेस घरकुल भाग हा भाजपचा बालेकिल्ला असून सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक १० मधून दिला जाईल असा विश्वास विनोद केंजरला, रुचिरा मासम, विजय इप्पाकायल, रविकांत वाघमारे, रुपेश भोसले यांनी दिला.पदयात्रा गोंधळे वस्ती, न्यू रंगराजनगर,राजेश कोठेनगर, गणेश नगर, श्रीकृष्ण देवस्थान, विजय मारुती देवस्थान, शिव मारुती मंदिर, राम मंदिर, राष्ट्रमाता शाळा, दत्त मंदिर, जी ग्रुप हनुमान मंदिर, येथून लक्ष्मी चौक येथे पदयात्रा संपन्न झाली.या पदयात्रेत सतीश शिरसिला, शेखर इगे, यादगिरी तोंडगळ, श्रीनिवास सिद्राल, राजेंद्र मासम, श्याम भिसे आबा शिंदे,भास्कर आडकी, विनायक सामल, महेश बुगडे, प्रवीण पासकंटी, अंबादास मिठापल्ली, प्रवीण साका,गणेश अन्नम भास्कर, मरगल, राजन सिरसिला, अतुल भंडारी, राजू कोंतम, यादगिरी आरगे,शरद यन्नम आदींनी या पदयात्रेत सहभागी नोंदवला.