सोलापूर : महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने केले आहे. महायुती पुन्हा सत्येत आल्यास महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे बोलताना दिले.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (ए) गट महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सुनिलनगर परिसरात प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस महिलांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सुरुवातीला भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या लाडक्या बहिणींना, महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, ओबीसी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस इंदिरा कुडक्याल, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा रंजीता चाकोते, प्रदेश चिटणीस अर्चना वडनाल, प्रदेश कार्यकारणी सदस्य शोभा नष्टे, माजी नगरसेविका राधिका पोसा, विजयलक्ष्मी गड्डम, सोशल मीडिया मध्य विधानसभा महिला प्रमुख अंजली वलसा, शहर चिटणीस सावित्री पल्लाटी, चिटणीस संगीता खंदारे, मोनिका कोठे, जैन प्रकोष्ठ प्रमुख साधना संगवे, महिला मंडल अध्यक्षा लक्ष्मी बदलापुरे, राधिका चिलका, धनश्री कोंड्याल, अर्चना बोमड्याल उपस्थित होते.
वाघ म्हणाल्या, ज्या महिलांना अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत अशा सर्व महिलांना निवडणूक संपल्यानंतर मागील चारही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. महिला भगिनींना योजनेचे पैसे मिळू नयेत याकरिता काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे न्यायालयात गेले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही महिला विरोधी भूमिका मतदान करताना महिलांनी आणि पुरुषांनीही ध्यानात घ्यावी, असे आवाहनही वाघ यांनी यावेळी केले.
महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाहीत. उलट नियमित आणि वाढवून मिळतील याची खात्री महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गाला आहे. काँग्रेसने महिलांची मते घेतली. परंतु महिलांसाठी काहीही केले नाही. काँग्रेसने जनतेचीच काय तर काँग्रेसच्या आणि इतर सहकारी पक्षाच्या नेत्यांचीही फसवणूक केल्याचे सोलापुरात दिसून येत आहे. केसाने गळा कापणाऱ्या काँग्रेसकडे न जाता मतदार बंधू-भगिनींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याप्रसंगी केले.
उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, सुनील नगर आणि परिसरातील नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद पदयात्रा, प्रचार फेरी, होम टू होम प्रचार अभियानाला मिळत आहे. त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचा विजय निश्चित आहे.या पदयात्रेत भाजपाचे शेले, टोप्या परिधान करून यावेळी शेकडो कामगार बांधव, सुनीलनगर आणि परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, माजी नगरसेवक डॉ. राजेश अनगिरे, काशिनाथ झाडबुके, भाजपा शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर, माजी नगरसेविका राधिका पोसा, शहर चिटणीस सुनील गौडगाव, विधानसभा पदयात्रा प्रमुख दत्तात्रय पोसा, मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, ओबीसी मोर्चाचे मंडल अध्यक्ष भीमाशंकर बिराजदार, सिद्धाराम खजुरगी, मंडल उपाध्यक्ष भीमाशंकर जावळे, सुनिता कामाठी, सोशल मीडिया शहर संयोजक अभिषेक चिंता, शहर मध्य विधानसभा सोशल मीडिया संयोजक अंबादास सकिनाल, विधानसभा सहसंयोजक भास्कर बोगम, डॉ. राजेंद्रप्रसाद गाजुल आदी सहभागी झाले होते.