सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी मॉर्निंग वॉक करत मतदारांशी ‘चाय पे चर्चा’ केली. देवेंद्र कोठे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून नागरिकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर शहरातील मार्कंडेय उद्यान, वल्याळ मैदान, क्रॉस फिट जिम आदी परिसरात देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी सकाळी कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संवाद साधला. सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांना भेटून त्यांच्यासोबत चहा घेत महायुती सरकारकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी देवेंद्र कोठे यांना भेटण्यासाठी, त्यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, शहर मध्य विधानसभेतील नागरिकांच्या प्रश्नांचा अभ्यास आम्ही केला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील परिसर असूनही या परिसराचा अपेक्षित विकास न झाल्याने येथे अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. त्यामुळे येथील विकासाची पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणींसह मतदार बांधवांनी भाजपा महायुतीच्या पाठीशी उभे रहावे. शहर मध्यचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासनही उमेदवार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, दत्तात्रय पोसा, राम गड्डम, उमेश अंबाल, राजकुमार गुजर, नागनाथ बंडा, सिद्धेश्वर कमटम, अश्विन कोडम, हरी सोमा, नागेश सरगम, मनोहर इगे, रवी कोटा, श्रीकांत पेंटी, कुमार कुडक्याल, गिरीश केंची, प्रकाश गाजूल आदी उपस्थित होते.