सोलापूर : “गेले ते कावळे राहिले ते मावळे’ या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी अनेक पदे देऊनही पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांमुळे काहीही फरक पडणार नाही. मी आमदार व्हायच्या आधीपासून घोंगडेवस्ती हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिकेला इथले मतदार हे भाजपच्याच मागे राहतात, असे विधान महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी घोंगडे वस्ती येथील कॉर्नर बैठकीच्या मेळाव्यात केले.
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविकारोहिणी तडवळकर, अंबिका पाटील, माझी सभागृह नेते संजय कोळी, बाबुराव जमादार, राजकुमार पाटील, नागनाथ खटके, आप्पा शहापूरकर, किसन घोडके, रघुनाथ मिस्किन, दत्ता बडगु, शशी अन्नलदास, जगदीश होनराव, श्रीपाद इराबत्ती आदींची उपस्थिती होती. देशभरात जेव्हा भाजपच्या विरोधात अपप्रचार चालू होता, त्यावेळेस शहर उत्तरमधील जनतेने भाजपवर विश्वास ठेवून ३६ हजार मतांचा लीड दिला. भवानीपेठ, घोंगडेवस्ती हा भाजपचा बालेकिल्ला असून लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेला येथील मतदार भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देत आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचण्याचा काम भाजपच्यावतीने चालू आहे. अन्नपूर्णा योजना, उज्वला गॅस योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, स्मार्ट सिटी योजनेतून शहरात झालेल्या हजारो कोटींचे काम, महिलांसाठी सोलापूर शहरात स्वतंत्र हॉस्पिटल आणि राज्य सरकारची लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातल्या प्रत्येक गृहिणींना आर्थिक मदत होत आहे. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेतील महिलांना २१०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी भाजपला मतदान करावं असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केले.
संघ आणि भाजपला आईबाप मानणाऱ्या,पक्षाच्या जीवावर मागील पंचवीस वर्षापासून मोठे झालेल्या या भागातील भाजपला सतत त्रास देणाऱ्या सुरेश पाटील यांचे नाव न घेता अनंत जाधव यांनी त्यांची लायकी आणि औकाद काढली. दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांची टोलेजंग इमारत कशी झाली? कितीही “कोठे’ येऊ द्या, कुणाच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, अशी टीकाही सुरेश पाटील यांचे नाव न घेता भाजपचे अनंत जाधव यांनी केली.पक्षाने या भागातील माजी नगरसेवकाला २५ वर्षांमध्ये अनेक पद दिली. पाच वेळा नगरसेवक पदाचे तिकीट, दोन वेळा विरोधी पक्षनेता, महानगरपालिकेचा सभागृह नेतेपद, जिल्हा नियोजन मंडळ, स्थायी समिती सभापती, यासह अनेक पदे देऊन पार्टीने काही दिलं नाही म्हणून पक्षाच्या नावानं गळा काढणाऱ्या व्यक्तींना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्या भागातील लोकांच्या जीवावर चुकीचं राजकारण करून कायम दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींना घरी बसवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे नाव न घेता राजकुमार पाटील यांनी केली.
प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिक हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर या भागातील नागरिक मनापासून प्रेम करतात. निवडून आल्यावर याहून मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ, असे माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सिद्राम जाडगल, विजय पुजारी, मल्लिनाथ चोपडे, सुरेश जमादार, महेश कोळकर, सुरेश पाटील, जिंदा गंजली, उमेश जमादार, आनंद गुजले, सोमनाथ बिराजदार, वीरेश मंधकल, नागेश पुजारी, चंद्रकांत मेटी, बालाजी बोड्याल, रवी कावळे, पप्पू जोशी, प्रभाकर ज्याडगळ, जुनेद तांबोळी, हिशोब इनामदार, श्रीनिवास ,इस्माईल शेख, श्रीकांत जिट्टा, मल्लेश पुजारी, मढी मार्चला, रवी कोळी, सुदीप मेटे, गणेश कामूर्ती, गुरु आलुरे,अंबादास भाईकट्टी, याकुब शेख, चंद्रकांत गंदाळ, लिंबाजी शहापूरकर, सिद्धाराम खानापुरे, अंबादास टंकसाळ, नितीन माने, मल्लिनाथ उपिन, फारुख इनामदार, सचिन धनश्री, विनायक शाखा, शशांक भाईकट्टी,प्रेम मरगळ, जेटपा पुजारी, शिवाजी खटके यांच्यासह भाजप्रेमी माता, भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गदगे यांनी तर आभार दत्ता बडगु यांनी मानले.