अभिनंदन! कांबळे, सारोळे, चोरगी यांच्यासह सात जणांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

सोलापूर : श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्था मंद्रूप व दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनच्यावतीने पत्रकार दिनाच्या औचित्य साधून “सोलापूर समाचार”चे वरिष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे, दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादकश्रीकांत कांबळे, दैनिक सकाळच्या उपसंपादिका प्रमिला चोरगी यांच्यासह सात जणांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
दोन ज्येष्ठ आदर्श पत्रकार पुरस्कार व पाच आदर्श पत्रकार पुरस्कारांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान लवकरच मान्यवरांच्याहस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले यांनी दिली. ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे व दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक श्रीकांत कांबळे यांना ज्येष्ठ आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच दैनिक सकाळमधील उपसंपादिका प्रमिला चोरगी. दैनिक तरुण भारतचे पत्रकार अमोगसिद्ध मुंजे, दैनिक लोकमतचे अक्कलकोटचे प्रतिनिधी शिवानंद फुलारी , लोकप्रधान न्यूजचे नारायण घंटे, क्राईम न्यूजचे श्रीकांत हाले यांची निवड आदर्श पत्रकार म्हणून करण्यात आली आहे. शाल,श्रीफळ ,सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही निवड सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्था मंद्रूपच्या कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आली . सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले यांनी ही निवड जाहीर केली आहे. पत्रकार दिनाच्या औचित्य साधून दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. पहिल्याच वर्षी निवड झालेल्या पत्रकारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.