सोलापूरजिल्हा परिषद

ट्रेनिंग सेंटरमध्ये बेकायदा बदली; त्या बदल्यात घर बांधून घेतले

सोलापूर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी नागनाथ पाटील यांची बदली केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या कारनाम्याची वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. इतक्या तक्रारी असताना पाटील यांना आत्तापर्यंत पाठीशी कोण घातले व त्यांच्या कारभाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यातून होत आहे.

आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी नागेश पाटील यांना सीईओचा दणका हे वृत्त प्रथम “सोलापूर समाचार’ वरून प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. वास्तविक सर्वसाधारण बदल्या वेळीच पाटील यांची बदली होणे अपेक्षित होते. पण कालावधी पूर्ण झाल्या नसल्याचे दाखवून त्यांना आरोग्यामध्येच ठेवण्यात आले. बदल्या करताना यादी त्यांचे नाव नसल्याचे पाहून तक्रारी झाल्या. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी याची गंभीर दखल घेतली. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर मार्चमध्ये पाटील यांचे स्थानांतर बदली झाली. या चौकशीला विलंब लागला आहे. याशिवाय पाटील यांना पाठीशी कोणी घातले व त्यांच्या बेकायदा कारभाराचा आता पाडा वाचला जात आहे. पाटील यांच्या कारभाराचे अनेक धक्कादायक किस्से आता बाहेर येत आहेत. त्यामुळे बदली हा इतकाच निकष न लावतात पाटील यांच्या कारभाराची विभागीय चौकशी करावी अशी आता मागणी होत आहे.

नागेश पाटील यांच्या स्थानांतरीय बदलीची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत खुलेपणाने चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी वाय.पी कांबळे यांनी नागेश पाटील यांच्या कारभाराचा पाढा वाचला आहे. पाटील यांनी आरोग्य विभागात केलेल्या अनेक बेकायदेशीर कामांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आरोग्य विभागात इतका सावळा गोंधळ सुरू असताना त्यांना पाठीशी कोणी घातले असाही सवाल उपस्थित केला आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी पाटील हे टेंडर उघडत होते, असा त्यांनी आरोप केला आहे. जिल्हा आरोग्य विभागाचे गुरूनानक चौक येथे प्रशिक्षण विभाग आहे. यासाठी महिला आरोग्य सहाय्यिकेचे आकृतिबंदमध्ये पद नाही. राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सहाय्यकेला प्रशिक्षण केंद्रात पद नाही. फक्त सोलापूर जिल्ह्यातच ट्रेनिंग केंद्रामध्ये हे पद भरण्यात आले आहे. दक्षिण सोलापुरातील भंडारकवठे येथील आरोग्य सेविकेला येथे बेकायदेशीर प्रतिनियुक्ति दिली आहे. त्याचबरोबर अनेकांकडून बनावट वैद्यकीय दाखले घेऊन पाटील यांनी बेकायदेशीर बदल्या व पदोन्नत्या केल्या आहेत. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. सोशल मीडियावर जाहीरपणे त्यांनी केलेली ही मागणी सर्वत्र व्हायरल झाली आहे त्यामुळे आरोग्य विभागातील पाटील यांच्या कारभाराचा परदाफाश झाला आहे.

इतकेच नव्हे तर पाटील यांनी बेकायदा बदली करून त्या बदल्यात आपले घरही बांधून घेतले अशी आता चर्चा सुरू झाली आहे. प्रशासन व आरोग्य विभागात नियुक्तीला असताना त्यांनी मोठा गैर कारभार केला. नर्सेस संघटनेने त्यांच्याविरुद्ध केलेली तक्रार कुणी बेदखल केली. याचीही चौकशी करण्यात यावी, अशी आता मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button