December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्था क्र. 2 च्या चेअरमनपदी शिवराज जाधव तर उपाध्यक्षपदी गिरीश जाधव

  • सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 2 च्या चेअरमनपदी शिवराज जाधव तर व्हाईस चेअरमनपदी गिरीश जाधव यांची निवड करण्यात आली.

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित क्रमांक 2, सोलापूर या संस्थेची सन 25-26 या सालाकरिता पदाधिकारी निवडीसाठी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी डी. एस. भवर सहाय्यक उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली दि. 9 जानेवारी रोजी सभा झाली. या सभेत पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या.
चेअरमन म्हणून शिवराज जाधव तर व्हाईस चेअरमन गिरीश जाधव,मानद सचिव सुधाकर माने- देशमुख, खजिनदारपदी राणी सुतार यांची निवड झाली. निवडीप्रसंगी संस्थेचे संचालक रणजीत घोडके, प्रकाश बिराजदार, विलास माने, श्रीकृष्ण घंटे,श्रावण मोरे, श्रीकांत धोत्रे, सतीश लोंढे व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. शेवटी संस्थेचे सचिव बापूराव जगताप यांनी आभार मानले. ही निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याचे उपनिबंधक भवर यांनी जाहीर केले.

वेबसाईटचे उदघाटन

जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक 2 च्या वेबसाईटचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन रणजित घोडके, व्हाईस चेअरमन  प्रकाश बिराजदार, गिरीश जाधव, सुधाकर माने देशमुख, शिवराज जाधव, श्रीकृष्ण घंटे, राणी सुतार, विलास माने, मोरे, श्रीकांत धोत्रे, आदी संचालक मंडळ, संस्थेचे सचिव, कर्मचारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास पतसंस्था क्रमांक 1 चे जेष्ठ संचालक विवेक लिंगराज, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, श्रीधर कलशेट्टी यांची उपस्थिती होती. पतसंस्था सभासदांना ऑनलाइन सेवा पुरवण्याचे उल्लेखनीय काम करीत असल्याने संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी अभिनंदन केले व भविष्यात प्रगतीबाबत शुभेच्छा दिल्या.