जिजाऊ जयंतीनिमित्त झेडपीत होणार “या’ महिला अधिकाऱ्यांचा आज सन्मान

सोलापूर : जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेतील कर्तुत्वान महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या निमित्ताने रक्तदान शिबिराचे हे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे. त्यानिमीत्ताने शनिवार दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदमधील सर्व जिजाऊ – सावित्री लेकींचा सन्मान करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याहस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे व मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.जी. के.देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कर्तृत्वान महिला म्हणून लेखाधिकारी रुपाली रोकडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण, वैदयकिय अधिकारी डॉ अनिसा तांबोळी, गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार, प्रशासन अधिकारी पुष्पा भड, शाखा अभियंता उषा भोसले, कनिष्ठ अभियंता सना नदाफ, विस्तार अधिकारी ( पं) स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी ( कृषि ) रेखा डोके, मुख्याध्यापिका ललिता मोरे, सहशिक्षिका उर्मिला माने, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे -पवळे, ग्राम पंचायत अधिकारी मंजुश्री कारंडे,वरिष्ठ सहाय्यक सुजाता कांबळे, वंदना जाधव, कनिष्ठ सहाय्यक आरती माढेकर, आरोग्य सेविका मैना माने, परिचर वर्षा औदुर्ती, सविता काळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच रक्तदान शिबीर सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश गोडसे, अध्यक्ष , मराठा सेवा संघ शाखा जि प यांनी दिली. कार्यक्रम नियोजनासाठी झालेल्यााा बैठकीला सचिन जाधव, सचिन चव्हाण, विकास भांगे,चेतन भोसले, वासुदेव घाडगे,विशाल घोगरे,रणजीत गव्हाणे, विट्ठल मलपे, सचिन पवार, रोहीत घुले, संतोष शिंदे अभिजीत निचळ,भूषण काळे, प्रकाश शेंडगे, सर्जेराव गाडेकर, उमेश खंडागळे,सचिन खराडे, प्रसाद काशीद, संतोष नीळ, जयंत पाटील, महेंद्र माने, सचिन लामकाने, अनिल पाटील, गोपाल शिंदे, संजय चव्हाण, व्ही.आर. कदम आश्विनी सातपुते, अनिता भुसारे , अनुपमा पडवळे , भारती धुमाळ,सविता मिसाळ, ज्योस्ना साठे, प्रतिक्षा गोडसे, उषा भोसले उपस्थित होते.