सोलापूरजिल्हा परिषदसंघटना-संस्था

संविधान जनजागृती काळाची गरज : सीईओ कुलदीप जंगम

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकने अत्यंत उपयुक्त असे संविधान साक्षरतेचे नवे उपक्रम संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनदर्शिकेच्या माध्यमातून केलेले आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी येथे बोलताना केले.

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्र.१ च्या २०२५ दिनदर्शिका प्रकाशनप्रसंगी भावना व्यक्त करताना सीईओ जंगम बोलत होते. QR code माध्यमातून संपूर्ण संविधान व संविधानाचे विविध वैशिष्ट्ये दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अवगत करण्याचे काम करून पतसंस्थेने एक वेगळा आदर्श या माध्यमातून दिल्याचे जंगम यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण प्रसाद मिर्कले, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, सागर बारावकर, वरिष्ठ भू वैज्ञानिक मुस्ताक शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, संजय पारसे, पंडित भोसले, मराठा सेवा संघ कर्मचारी शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्रा. डॉ.ऋतुराज बुवा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक चेअरमन डॉ.एस. पी. माने यांनी तर सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन व्हॉईस चेअरमन सुरेश कुंभार यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी संचालक विष्णू पाटील, शहाजहान तांबोळी, श्रीधर कलशेट्टी, विजयसिंह घेरडे, विशाल घोगरे,गजानन मारडकर,शिवानंद मह्मणे, तजमुल मुतवली, शिवाजी राठोड,किरण लालबोंद्रे,विकास शिंदे, मृणालिनी शिंदे, श्वेता राऊत, तज्ञ संचालक श्रीशैल्य देशमुख, नितिन शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय देशपांडे,अशोक पवार,सुभाष काळे,रीमा पवार,कल्याणी माने,नंदिनी पुजारी,प्रसन्न स्वामी,हणमंतराव गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद बीटमधील सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, राजकुमार सारोळे, विनोद कामतकर, अमोल साळुंखे यांच्यासह  पुरस्कार प्राप्त १३ पत्रकारांचा शाल, नंदिध्वज प्रतिकृती, संविधान उद्देशिका देवून सीईओ जंगम यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

संविधानाबाबत सखोल माहिती 

महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिनदर्शिका QR code माध्यमातून संविधानाची माहिती देण्याचे काम केले आहे असे मत प्रा. डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले. पतसंस्थेने संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने अर्थ, सामाजिक उपक्रमाबरोबर संविधानातून दिलेले विविध अधिकार, तरतुदी, वैशिष्ट्ये सर्वसामान्यांना अवगत करण्याचे काम केल्याने ही एक वेगळ्या प्रकारची देशसेवाच आहे असे मत प्रा. डॉ.ऋतुराज बुवा यांनी यावेळी बोलताना मांडले. मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी तिळगुळाचा कार्यक्रम झाला. पत्रकार प्रशांत कटारे, बगले, भालेराव, विश्वनाथ बिराजदार, श्रीशैल चिंचोळकर, वठारे मॅडम यांच्यासह जिल्हा परिषद बीटवरील सर्व पत्रकारांनाही सीईओ जंगम यांच्याहस्ते  तिळगुळ वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पतसंस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button