सोलापूरसण- उत्सव

सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर यात्रेची सांगता कशी होते हे तुम्हाला माहित आहे काय?

सोलापूर : ‘सिद्धरामेश्वर महाराज की जय’च्या घोषात योगदंडाची महापूजा व मानकरी हिरेहब्बू यांना आहेर करून दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यात श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींची गुरुवार दि. 16 जानेवारी रोजी सांगता झाली.

सुरवातीला योगदंडाला स्नान घालण्यात आले. त्यानंतर सुधीर देशमुख व राजशेखर देशमुख यांनी योगदंडाला विभूती, हळद-कंकू लावले. त्यानंतर कळसाची पूजा होऊन हळद-कुंकू लावण्यात आले. त्यासमोर पान-सुपारी ठेवण्यात आली. योगदंडाला पुष्पहार घालण्यात आला. आरती करण्यात आली. दूध, खीर, पुरण-पोळी, शेंगा चटणी, तीळ चटणी, कटाची आमटी, गाजर, मेथी, वांगी, घेवडा, गरगटा, ताकाची कढी, दही शेंगा चटणी, तिळ चटणी, मिक्स पालेभाज्यांची पातळ भाजी आदी पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, शिवशंकर हब्बू, अमित हब्बू, राजेश हब्बू ओंकार हब्बू गणेश हब्बू ‘ यांची पाद्यपूजा करून आरती करण्यात आली. होमाची पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, अभिराज देशमुख, क्षमा देशमुख, शिल्पा देशमुख, शीला देशमुख, संगीता देशमुख, अनिशा देशमुख, उर्वशी देशमुख उपस्थित होत्या. हिरेहब्बू यांचा प्रसाद झाल्यानंतर बाराबंदी काढून त्यांना आहेर करण्यात आला. अशाप्रकारे सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधी समाप्त झाले आहेत. 12 जानेवारीपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला 68 लिंगाणा तेल अभिषेकाने  सुरुवात होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अक्षता सोहळा, तिसऱ्या दिवशी होमविधी आणि भाकणुकीचा कार्यक्रम होतो. यात्रेतील धार्मिक विधी संपले असले तरी या यात्रेनिमित्त मैदानावर भरलेली गड्डा यात्रा 26 जानेवारीपर्यंत चालते. या काळात पंचक्रोशीतील नागरिक गडयात्रेवरील विविध खेळणी, पाळणे यांचा आनंद लुटण्यासाठी येतात. शाळांच्या सहलीदेखील भरवल्या जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button