
सोलापूर : ओपन प्लॉटचा पावणेदोन लाखाचा कर असल्याचे सांगून पन्नास हजाराची लाच मागून ऑनलाइन 21 हजाराचा कर भरणा करून 28 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी महापालिकेच्या कर विभागातील वरिष्ठ लिपिक चंद्रकांत दोन तुला याच्याविरुद्ध लाचलुजपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदाराने 3000 स्क्वेअर फुटाचा ओपन प्लॉट खरेदी केला आहे. या प्लॉटची नोंदणी करून कर आकारणी करण्यासाठी त्याने महापालिकेच्या कर आकारणी विभागातील वरिष्ठ लेखनिक दोंतुल यांची भेट घेतली. दोन तुल्याने कागदपत्रे पडताळणी करून प्लॉटचा एक एप्रिल 92 पासून ते मार्च 2025 अखेर एक लाख 77 हजार 745 रुपये कर लागू होतो असे सांगितले. इतका कर भरायचा नसेल तर पन्नास हजार रुपये द्या मी कर भरल्याची पावती देतो असे सांगून त्याने तक्रारदाराकडून तितकी रक्कम घेतली. घेतलेल्या 50 हजार रुपये पैकी 21 हजार 255 रुपये त्यांनी ऑनलाईन कर भरणा केला व उर्वरित 28 हजार 745 रुपये स्वतःसाठी ठेवून घेतले. याबाबत संबंधित प्लॉट धारकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी पडताळणी केली. त्यात आरोपी लिपिक दोंतुल यांनी कर भरण्यासाठी म्हणून 50 हजार रुपये घेऊन 21 हजार भरणा केल्याचे दिसून आले. उर्वरित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी लाच म्हणून स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यावर याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.